प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  

सिंध— मुंबई इलाख्यांतील उत्तरेचा प्रांत. उत्तरअक्षांश २३ ३५' ते २८ ३९' व पूर्वरेखांश ६६ ४०' ते ७१ १०'. या प्रांतांचें क्षेत्रफळ ५३,११६ चौरस मैल असून, यांत कराची, हैद्राबाद, थर आणि पारकर, लारखाना, सक्करनवाबशहा व अप्परसिंध फ्रांटियर हे जिल्हे आहेत. हा प्रांत मुंबई इलाख्यांतील इतर प्रांतांपेक्षां भाषा, रहाणी, पोषाख, चालीरीती व लोक या बाबतींत सर्वस्वी भिन्न आहे. उत्तरेस बलुचिस्तान व पंजाब; पूर्वेस राजपुताना; दक्षिणेस कच्छचें रण व अरबी समुद्र; व पश्चिमेस बलुचिस्तान. लोकसंख्या (१९२१) ३२,७९,३७७. येथील रहिवाशी मूळचे हिंदी पण पुढें मुसुलमान झालेले असे आहेत. मुसुलमानांतहि, अफगाण, बलुची, सिद्दी, मेमन, खोजे, इत्यादि भेद आहेत. शीखहि बरेच आहेत. हिंदु मात्र थोडे आहेत. मुख्य भाषा सिंधी आहे. येथें पाऊस फार थोडा पडतो. येथील शेती मुख्यतः कालव्याच्या पाण्यावरच होते. सिंधु नदीला ठिकठिकाणीं कालवे काढलेले आहेत. गहूं, बाजरी, भुइमूग, जोंधळा हीं धान्यें पिकतात. शिवाय कापूस व नीळहि पिकतें. सक्कर येथें सिंधु नदीला धरण बांधून त्या पाण्यावर ईजिप्शियन धर्तीचा लांब धाग्याचा कापूस काढण्याची योजना सुरू आहे. कलाकौशल्याचें काम सिंधमध्यें विशेष होतें. वेलबुट्टीचे सुंदर गालीचे येथें तयार होतात. सर्व प्रकारचें चामड्याचें सामान, पादत्राणें, खोगीर, जीन, वगैरे येथें तयार केलें जातें. पूर्वी हैद्राबाद शहर सोनें, रुपें व रेशीम यांचें कलाकुसरीचें काम करण्याबद्दल प्रसिद्ध होतें. लाखेचें काम, तसेंच चिटे अगर कापडछपाईचें काम येथें चांगलें होतें. येथील मातींचीं भांडीं सर्व हिंदुस्थानामध्यें प्रसिद्ध आहेत. कराची हें सिंधमधलें व्यापारी बंदर आहे. तेथील व्यापार दिवसानुदिवस वाढत आहे परदेशाहून हिंदुस्थानांत येणारा सर्व प्रकारचा माल कराचीस उतरतो. मध्यहिंदुस्थान, पंजाब व संयुक्तप्रांत वगैरेकडील माल कराची बंदरांतूनच परदेशीं जातो.

राज्य व्यवस्था.— सिंधचा हा जरी वेगळा प्रांत म्हणून तोडलेला नसला तरी त्याची राज्यव्यवस्था स्वतंत्र आहे. एक कमिशनर यावर मुख्य असून तो सर्व कारभार पहातो. सिंधपुरतें वेगळें हायकोर्ट आहे.

इ ति हा स.— हिंदुस्थानच्या इतिहासाव्यतिरिक्त असा सिंध प्रांताला वेगळा इतिहास आहे. ख्रिस्ती शकाच्या आरंभी एका बौद्ध राजाचा ताबा त्या प्रांतांवर होता. हर्षाच्या वेळीं या प्रांतांत मौर्यवंशी साहसी नावाचा राजा राज्य करीत  होता. त्याची हकीकत चचनाम्यांत दिली आहे. याच प्रांतांतून प्रथमतः मुसुलमानांनीं हिंदुस्थानांत प्रवेश केला (इ. स. ७११). प्रथमतः ते लोक समुद्रमार्गानें येऊन सिंधु नदीच्या मुखांतून वरती आले. पुढें तीन शतकेंपर्यंत बगदादचे खलिफ यावर प्रतिनिधी मार्फत अंमल चालवीत. महंमदानें जरी हिंदुस्थानावर स्वार्या करून सिंध प्रांत जिंकला तरी तो अगदीं पूर्णपणें त्याच्या ताब्यांत गेला नाहीं. कांहीं मूळचे स्थानिक रजपूत पण जे बाटून मुसुलमान झालेले, अशा लोकांच्या ताब्यांत सिंध असे. तैमूरलंगाच्या स्वारीमुळें दिल्लीचें साम्राज्य ढिलें होऊन सिंध स्वतंत्र झालें. यानंतर सिंधचे राजे सुम्र घराण्यांतील होते; त्यांनीं १३३८-१३५७ पर्यंत राज्य केलें. नंतर सम्म राजांचा अंमल १५१९ पर्यंत चालला. नंतर बाबरचा अंमल सुरू झाला. औरंगझेबाच्या वेळीं स्थानिक लोकांनीं बंड करून मोंगली सत्ता विस्कळित केली. तथापि १७६२ पर्यंत ती टिकून होती. पुढें मीर नांवाचा एक बलुची मुख्य झाला व इंग्रजांनीं तो प्रांत जिंकीपर्यंत तो या मीर बलुची घराण्याकडेच होता. ईस्ट इंडिया कंपनीनें १७५८ सालीं ठठ्ठा येथें आपली एक वखार स्थापिली. परंतु इंग्रजांचें व या मीरांचें नीट जुळत नसे. त्याचा परिणाम १७७५ त इंग्रजांनां ती वखार बंद करण्यांत झाला. १८३२ त मीरांशीं व्यापारी तह झाला. इंग्रजांनीं सैन्याच्या जोरावर मीरांनां हा तह करण्यास लावलें व सिंधु नदींतून निर्वेधपणें व्यापार करण्याची परवानगीहि मिळविली. व पुढें चार्लस नेपीयरनें हा प्रांत अन्यायानें खालसा केला (१८४३). ('नेपीयर सर चार्लस पहा'). तेव्हांपासून आजतागाईत सिंधवरा ब्रिटिश सत्ता चालत आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .