प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  

साबूदाणा— साबूदाणा हा शब्द मलायी ''सागु''पासून आपल्या भाषेंत आलेला आहे. हें झाड ताडाच्या जातीचें व त्यासारखें असून ह्याचें इंग्रजी वनस्पतिशास्त्राप्रमाणें नांव मॅट्रोक्सिलॉन असें आहे. साबूदाणा हा मलायी पदार्थ आपल्या उपहारामध्यें व मुख्यत्वेंकरून उपवासामध्यें कसा व केव्हां आला हें निश्चित सांगतां येणार नाहीं. पण इतकेंच सांगतां येईल कीं, तो मद्रासी किंवा सिलोनी लोक जेव्हां मलाया बेटांशीं व्यापार करीत होते त्या वेळेपासून इकडे आला. साबूदाण्याच्या इतिहासामध्यें सिंगापूरचें वर्णन व माहिती जरूरीची आहे; कारण त्याच ठिकाणाहून सर्व जगाला त्या पदार्थाचा पुरवठा होत असतो व मलाया बेटांतील सर्व उत्पन्नाचा खप करणारी ही मोठी बाजाराची पेठ आहे. साबूदाण्याविषयीं लोकांमध्यें अजून पुष्कळ कल्पना आहेत व सर्वसाधारण समजूत अशी आहे कीं, (१) तो झाडाच्या ढोलींतून दाण्याच्या रूपानें (२) किंवा बुंध्यांतून चिकाच्या रूपानें निघतो. कांहींहि असो; तो फार सात्त्विक व दमदार आहे असें आढळून आल्यानंतरच मग त्याचा प्रवेश आपल्या वैद्यकशास्त्रांत व नंतर धर्मशास्त्रांत झाला.

या झाडाच्या पोटजाती ६ असून त्या फक्त मलाया बेटें, नोव्हागिनी व फिजी येथपर्यंतच फक्त सांपडतील व त्यांचीं झाडें विषुववृत्तापासून १० अंश उत्तरेकडे व दक्षिणेकडे आढळून येतील. ६ पोट जातींपैकीं फक्त दोहोंची लागवड (मे. रुंफी व मे. सागुस) मोठ्या प्रमाणावर करतात; पैकीं पहिला कांटेरी व दुसरा बिनकांटेरी आहे. दुसर्याला मलाया लोक ''सागुप्रेमपुवान'' (स्त्री साबुदाण्याचें झाड) असें म्हणतात. मलयामध्यें ओलसर जंगलांत (बेट फॉरेस्ट रीजनमध्यें) यांची लागवड दृष्टोत्पत्तीस येते. ही झाडें उत्तम येण्याचें ठिकाण म्हणजे अगदीं दलदलीची, खोलगट, नदी व खाडीकांठची सपाट व ज्या ठिकाणीं मांडीइतका चिखल असल्याकारणानें ओसाड पडलेल्या जागा असतात, ह्यामध्यें या झाडाची लागवड उत्तम होते. झाडांची लागवड बीं किंवा खुंटापासून करतात. बी लावल्यापासून १२ ते १८ महिन्यांनीं रोप शेतांत लावतात तें लहान असतांना त्याच्या बुंधावर कांटे असतात. पण जसजसें तें स्वरंक्षण करण्याला योग्य होतें तसतसें बुंधावरील कांटे गळून पडतात. झाड लावल्यापासून त्याची पूर्ण वाढ होण्यास ९/१० वर्षे लागतात व तें पीठ काढण्यास योग्य होतें. ह्या वेळीं त्याची सरासरी उंची ३०-३५ फूट असून घेर ३१/२ फुटांपर्यंत असतो. कांहीं बेटांमध्यें ह्यापेक्षां सुद्धां जास्त उंची व घेर आढळून येईल.

साबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीचा खर्च फारच थोडा असतो. झाडाला पुष्कळ पिल्लें फुटतात व एकदां लागवड केली म्हणजे ती पुन्हां करण्याचें कारण पडत नाहीं. झाडें तयार झालीं किंवा नाहीं हें मात्र बरोबर ओळखलें पाहिजे. नाहीं तर बीं आल्यामुळें झाडाचें सबंध खोड पोकळ झालेलें आढळून येईल.

साबूदाण्याचें पीठ व दाणे तयार करण्याची रीत — झाड तयार झालें किंवा नाहीं हें चिनी मलाया लोकांनां चांगलें कळतें. सर्व पाहून ठरल्यावर एके ठिकाणीं पीठ तयार करण्याची जागा व एक झोपडें तयार करतात. नंतर रस्ते पाडतात. झाड तोडल्यावर बुंधाचे ३/४ फूट लांब इतके ओंडके तयार करतात. हे ओंडे गडगडत किंवा मोठा पाण्याचा पाट असला तर त्यांतून वाहून नेतात. अलीकडे फॅक्टरीमध्यें यांत्रिक साधनें आल्यामुळें ओंडे तोडून मोनोरेलवर घालून तिकडे नेतात. चिनी लोक यंत्राचा उपयोग करीत नाहींत. ओंडे ह्या जागेवर आणल्यानंतर प्रथम त्यांची साधारण जाड साल काढतात. व तें ओंडे एका ३/४ फूट उंचीच्या घडवंचीवर ठेवून किसतात. ही किसणी ८/९ इंच रुंद; ३/४ फूट लांब व १ इंच जाड अशा फळीला ३/४ इंची खिळे मारून केलेली असते. म्हणजे ते खिळे दुसर्या बाजूनें फक्त टोंकानें पुढें येतील. हा किसलेला भुसा खालीं जमिनीवर पडतो. घडवंची नजीक एक पाण्याचें डबकें व त्यांतील पाणी काढण्याकरितां ''पिकोटा'' व पाण्यापासून २/३ फूट उंचीची घडवंची असून तीवर एक वेताची चटई पसरलेली असते. चटईवर प्रत्येक वेळीं ३/४ टोपल्या किसलेला भुसा टाकतात व त्यावर डबक्यांतील गढूळ सांचलेलें व पाटामधून वहात आलेलें पाणी पिकोट्यानें ओतून वर नाचतात व समोरासमोरचीं चटईचीं दोन टोकें धरून भुसा हालवितात. ह्या कामाला दोन मनुष्यें लागतात. पाणी घालण्याचें व हालवण्याचें मधून मधून चालूच असतें. असें ६/७ दां केल्यानंतर तो भुसा फेकून देतात. भुश्यांतील निघालेलें पाणी पिष्टमय पांढुरकें होऊन चटईंतून खाली पडून मग पन्हाळानें वहात वहात निवळण्याकरितां केलेल्या हौदांत जातें. प्रत्येक दिवशीं सध्याकाळीं हौदांतील निव्वळ काढून टाकून मग पीठ वर काढतात व दुसरीकडे उथळ व रुंद हौदांत पसरून वाळवितात. ह्या पिठामध्यें त्याचें वजन वाढविण्याकरितां कधीं कधीं शिजवलेला भात सुद्धां टाकलेला आढळेल. पण हे सर्व प्रकार हातांनीं केलेल्या पिठामध्यें सांपडतात. यंत्राच्या साहाय्यानें केलेलें पीठ निव्वळ व शुद्ध झाडापासून काढलेलें असतें.

पीठ दोनदां धुतल्यावर तें उन्हांत किंवा यंत्राच्या साहाय्यानें वाळवितात. हेंच साबुदाण्याचें पीठ म्हणून बाजारांत विकण्याकरितां पाठवितात. पिठाचा पुष्कळ खप कापडाच्या गिरण्यांत होतो व कांहीं प्रमाणांत चाकोलेट, बिस्किटें यांकडे होतो; तसेंच मलया, जावा, सुमात्रा वगैरे बेटांतील लोक त्याच्या भाकरी, बिस्किटें, केक्स, कांजी वगैरे करून खातात. हाच त्यांचा नेहमींचा खाण्याचा पदार्थ होय.

साबूदाणा करण्याची तर्हा.— वर सांगितलेलें पीठ दाणा करण्याकरितां फॅक्टरीमध्यें आणतात. तेथें तें ८/१० वेळां स्वच्छ चांगलें धुवून मग दाणे करण्याच्या जागी नेतात. दाणे तयार करण्याची तर्हा अद्याप आहे तशींच आहे. कारण दाण्याला पिठासारखा खप नाहीं. दाणा तयार करण्याची जागा एका बाजूला असून तेथें एका लांब व अरुंद चुलाणावर लोखंडाचा पत्रा टाकलेला असतो. व २/३ फूट उंचीवर धोतरासारखें लांब पण विरळपोताचें (ज्याप्रमाणें दाणा बारीक मोठा पाहिजे असेल त्याप्रमाणें) कापड टांगलेलें असतें. ह्या कापडावर थोडथोडें ओलसर पीठ पसरून दाबतात. म्हणजे बारीक मोठे दाणे खाली चुलाणावर असलेल्या पत्र्यावर पडतात. पत्र्याला गोळे चिकटूं नयेत म्हणून त्यास कांहीं स्निग्ध पदार्थ लावतात. दाणे पत्र्यावर पडल्यानंतर थोडक्याच वेळांत वाळून काढले जातात. अशा रीतीनें तयार झालेला दाणा आपल्या उपवासाचा ''साबुदाणा'' होय.

साबुदाण्याच्या पिठापासून (१) बारीक साबुदाणा (पर्लसागो), (२) मोठा साबुदाणा (बुलेट सागो) व (३) वड्या (बिस्किटें अँड क्यूबसागो) इतक्या तर्हा करतात. साबुदाणाच्या झाडाची लागवड फारच कमी दगदगीची, कमी खर्चाची व जेथें कांही होण्यासारखें नाहीं अशा ठिकाणी होणारी आहे. तसेंच त्याच्या झाडापासून ३॥-४ मण पीठ निघतें व खर्चवेंच वजा जातां प्रत्येक झाडापाठीमागें १०/१२ रुपये निव्वळ फायदा मिळतो. [गो. भि. देशमुख यांचा चित्रमयजगतांतील लेख].

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .