प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद

साबण— साबणाचें अस्तित्व अगदीं अर्वाचीन वाटत नाहीं. हिंदुस्थानांतहि ३।४ शें. वर्षांपूर्वी साबण दिल्ली, आग्रा, कपडगंज इत्यादि ठिकाणीं होत होतां. तो पापडखार, खारी माती, चुना व तेल ह्यांच्या साहाय्यानें कारीत असत व अजूनहि करतात. परंतु आपल्याकडे साबणाचा उपयोग नुसता कपड्यास लावण्याकरितांच करीत असत. हल्लीं साबणाचे अनेकविध उपयोग होऊं लागले आहेत.

साबणास लागणारीं रासायनिक द्रव्यें.— कॉस्टिक सोडा व पोट्याश हीं दोन द्रव्यें मुख्य होत. पहिल्यापासून घट्ट व दुसर्यापासून पातळ साबू होतो. या दोन्हीहि तेलांमध्यें वनस्पतिज व प्राणिज तेलें वापरतात. धार्मिक अडचणीमुळें हिंदुस्थानांत वनस्पतिज तेलेंच वापरतात. याशिवाय साबणांत भेसळ करण्याकरितां सोडियम सल्फेट, पापडखार, खडू इत्यादि वस्तूंचाहि उपयोग करतात.

साबणास लागणारीं तेलें:— या तेलांचे स्थूलमानानें खनिज, प्राणिज व वनस्पतिज असे तीन भाग पाडतां येतील. या निरनिराळ्या तेलांचा उपयोग निरनिराळ्या प्रकारचा साबू तयार करण्याकडे होतो: (१) खनिज तेलांत पॅराफिन व व्हॅसेलिन हीं मुख्य होत. (२) प्राणिज तेलांत- मेण, चर्बी, माशाचे तेल इत्यादि मुख्य होत. (३) वनस्पतिज तेलांत जणनी मेण, कोंकमतेल, खोबरेल मोइडा तेल हीं मुख्य होत; याशिवाय जवस, खसखस, व कित्येकांत तूपहि घालतात. साबणाची कृति एकच अशी नाहीं. निरनिराळ्या प्रकारच्या साबणांना त्यांच्या गुणधर्माप्रमाणें निरनिराळे पदार्थ कमीजास्त प्रमाणांत घालावे लागतात.

साबणाच्या मुख्य कृती.— या दोन आहेत: पहिली थंडी कृति व दुसरी गरमकृति. (१) थंडी कृति:-दिखाऊ साबण फक्त ह्या कृतीनें करतात. ह्याला श्रम थोडे लागतात. व ह्यामध्यें पाणी फार मिसळावें लागत नसल्यामुळें ह्याला जळण कमी लागतें. साबण वाळण्यासहि वेळ लागत नाहीं. पण ही कृति कितीहि जपून केलीं तरी ह्या कृतीनें तेल व सोडा ह्यांचा पूर्ण संयोग होत नसल्यामुळें ह्यामध्यें सोडा जरा जास्त राहतो. ह्या सोड्याचा परिणाम त्वचेवर होतो. हा अंगास लावल्यास अंगाची आग होते व अंग मऊ न होतां खरखरीत होतें. बहुतेक नवे व छोटे कारखानदार ह्याच कृतीचा अवलंब करतात. पण ह्या साबणास चांगलें व कायमचें गिर्हाईक मिळत नाहीं. तरी ह्या साबणाचा कपडे धुण्याकडे व यांत्रिक काम केल्यानें मळलेले हात धुण्याकडे चांगला उपयोग होतो. हा साबण खोबरेल तेलाचा फार लवकर तयार होतो. कारण तीव्र द्रवानें ह्याचा साबण लवकर बनतो.

खोबरेल तेलाचा थंडा साबण:— १५ पौंड (रत्तल) उत्तम खोबरेल तेल घ्यावें व तें थोडें गरम करावें. त्यांत ९८-९९ अंशाचा सोड्याचा द्रव घालावा व मिश्रण चांगले अर्धापाऊण तास ढवळावें. सोड्याचा द्रव करण्यासाठी ३ पौंड सोड्याची पूड घेऊन तीत १२ पौंड म्हणजे चौपट पाणी घालावें. हा द्रव अल्युमिनच्या किंवा लोखंडाच्या भांड्यांत करावा. साबण लवकर घट्ट व्हावा अशी इच्छा असल्यास सोड्यांत फक्त ६ किंवा ७ पौंड म्हणजे सुमारें दुप्पट पाणी घालावें. ह्या सोड्याचा द्रव फक्त पाणी व सोडा मिसळून ढवळल्यानें होतो. तो द्रव होतांना आधणाच्या पाण्याइतका गरम होतो. हा जरा निवून द्यावा. खोबरेल तेल व हा सोडा ह्या दोहोंची उष्णता सारखी ठेवावी. ही उष्णता १५०० किंवा १५५० अंशपर्यंत ठेवावी. दोहोंचें मिश्रण सारखे ठेवल्यानें साबण लवकर होतो. मग हें मिश्रण चांगलें ढवळावे. हे मिश्रण मग घट्ट होऊं लागेल. तें काकवीहून जास्त घट्ट झालें म्हणजे ते ढवळण्याचें बंद करावें. हा द्रव एका चौकोनी लोखंडी पेटींत घालून तीवर लोंकरीचीं फडकीं गुंडाळून ती एका बाजूस पण गरम ठिकाणीं ठेवावी. पाणी दुप्पट घातलें असेल तर साबण तीन दिवसांत तयार होईल; चौपट घातलें असेल तर साबणास आठ दिवस लागतील. साबणांत पाणी जास्त घातलें म्हणजे त्याचा एकजीव चांगला होतो व क्षार जरा कमी सुटा राहतो. साबण घट्ट झाला म्हणजे त्याच्या बाजू वाळूं लागतील. मग ती पेटी एक दिवस उघडी ठेवावी व मग पालथी घालावी व पेटीच्या बुडावर जरा ठोकावें. म्हणजे साबणाची ढेप खालीं पडेल. मग त्यावर सारख्या अंतरावर खुणा करून त्या खुणांवरून तुकड्यांचे बार कापावें.

धुण्याचा थंडा साबण:— खोबरेल ५ पौंड, चर्बी ६ पौंड. ९८-९९० अंश सोडा २ पौंड व पाणी ६ पौंड. कृति वरील. या रीतीनें साबण तयार झाला म्हणजे पेटींत घालण्यापूर्वी त्यांत १ पौंड पापडखार व ३ पौंड पाणी ह्यांचा द्रव घालावा व तें मिश्रण चांगलें ढवळावें व त्याचा एकजीव करावा. पापडखाराऐवजीं सिलीकेट ऑफ सोडा वापरला तरी चालेल. ह्या साबणास रंग द्यावयाचा असल्यास तो प्रथम तेलांत किंवा सोड्यांत मिसळावा. तसेंच वास द्यावयाचा असल्यास सोडा ढवळून झाल्यावर मग वास घालून ढवळावें. वास देण्यापूर्वी रंग दिला तरी चालेल. सोडा मिसळतांना वास देऊं नये कारण त्यामुळें बराच वास फुकट जातो.

(२) साबणाची गरम कृति:- खोबरेल किंवा समुद्रसाबण:- प्रमाणः १५० पौंड खोबरेल, ९८-९८ सोडा २७ पौंड + पाणी २७० ह्या कामीं २ लोखंडी कढ्या पाहिजेत. एक २५० पौंड पाणी मावेल इतकी असावी व दुसरी ५०० पौंड मावेल इतकी असावी. वर लिहिलेल्या मिश्रणाहून कमी किंवा जास्त ज्या प्रमाणानें साबण करावयाची असेल त्यामानानें कढ्या असाव्यात. लहान कढईंत सोड्याचा द्रव करावा. मोठ्या कढईंत साबण करावा. मोठ्या कढईंत खोबरेल घालावें व ते साधारण गरम करावें. म्हणजे वितळू लागेल मग त्यांत सोड्याचा द्रव थोडाथोडा घालून तें मिश्रण लांकडाच्या वल्ह्यानें सारखें आंतल्याआंत ढवळावें. ह्या कामीं लहान होडग्याचीं जुनी वल्हीं मिळालीं तर बरें. नाहीं तर सागवानाचें किंवा देवद्वार लांकडाचें ढवळणें तयार करावें. सागवानाच्या ढवळण्याचा रंग प्रथम थोडासा साबणास येईल मग पुढें फारसा येणार नाहीं. देवद्वाराचा तर फारच थोडा रंग येतो. सोड्याचें पाणी संपेपर्यंत साबण शिजवावा. ह्याला शिजण्यास सुमारें पांच सहा तास लागतात. सोड्याचा द्रव एवढ्या वेळांत संपेल अशा रीतीनेंच मंदाग्नीवर साबण शिजविला पाहिजे. नाहींतर आणखी जास्त पाणी घालावें लागेल. त्यामुळें जळणाचा खर्च विनाकारण जास्त होईल. त्याचप्रमाणें साबण उतूं जाऊं नयें, अशी व्यवस्था करावी. मोठ्या कारखान्यांत साबणांत वाफेच्या नळ्या सोडून त्यानें साबण शिजविण्याची व ढवळण्याची व्यवस्था केलेली असते. जळणासाठीं लांकूड किंवा शेणी वापराव्या. पण साबण मोठ्या प्रमाणावर करावयाचा असल्यास भट्टींत लोखंडाची जाळी घालून तींत दगडीं कोळसा वापरावा. दगडी कोळशाबरोबर इतर फुकट जाणारें जळणहि वापरलें तरी चालेल.

साबण शिजविणें:- तेलांत प्रथम सोड्याचें पाणी घालतांच तेल पांढरट होऊं लागतें. मग पुढें आणखी सोडा घातल्यास व पंधरावीस मिनिटें शिजविल्यास खालीं साबण अर्धवट बनलेला दिसेल व वरती तेलाचा थर दिसेल. सुमारें तीन तासांनी साबणाचा रंग पिवळट व अर्धवट पारदर्शक होऊं लागेल. पांच तांस पुरे झाल्यावर सर्व साबण पारदर्शक म्हणजे पाण्यासारखा दिसू लागेल. असा रंग आला म्हणजे साबण होत आला असें समजावें. असा रंग आल्यावर थोडा साबण कांचेवर घालावा. म्हणजे चार पांच मिनिटांत तो साबण थंड व घट्ट होऊन त्याचा कळपा निघेल. ह्यानें हात धुवून पहावा. हाताला जास्त बुळबुळीतपणा लागून ओढ लागल्यासारखी वाटल्यास त्यांत सोडा अद्याप चांगला मिसळला गेला नाहीं असें समजावें. साबण बुळबुळीत लागून फेंस कमी निघाल्यास तेल जास्त आहे असें समजावें. साबणामध्यें चुकून तेल किंवा सोडा जास्त झाल्यास पुन्हां ते पदार्थ घालून साबण शिजवावा. पण अशा वेळीं साबण पुन्हां चार पांच तास शिजवावा लागेल. व साबण चांगला बनणार नाहीं. साबण कांचेवरून निघूं लागल्यापासून अर्धा तास आणखी शिजवावा व त्यांत रंग घालावा. साबण साधारण निवण्यास सुमारें दोन तीन तास लागतात. आंघोळीच्या पाण्याइतका निवाल्यावर त्यांत वास घालावा व मग पेटींत ओतावा. साबण पेटींत घालून तो घट्ट होण्यासाठीं तसाच ठेवावा. सुमारें ३०-४० तासांनी साबण अगदीं घट्ट होईल. मग ठराविक पद्धतीनें साबणाची ढेप काढून त्याचे बार, वड्या वगैरे कापाव्या.

अंगाला लावण्याचा साबण एकदम करीत नाहींत. तेल व सोडा ह्यांचा साबण करून ठेवतात. व मग तो पुन्हां वितळवून त्यांत रंग घालतात व वास देतात. अशा साध्या साबणास सांटवणीचा साबण असें म्हणतात.

साबणाची परीक्षा:— (१) साबण जिभेला लावल्यास जिभेला चटका बसल्यास त्यांत सोड्याचा भाग जास्त आहे असें समजावें. साधारण क्षारासारखा लागल्यास सोडा व तेल योग्य प्रमाणांत असून साबण चांगला शिजला गेला आहे असें समजावें. तेलकट लागल्यास तेल जास्त झालें आहे असें समजावें. (२) रेड लिटमन पेपर घेऊन तो साबणाच्या पाण्यांत घालावा. तो जशाचा तसाच राहिल्यास साबण चांगला झाला असें समजावें व फिक्कट निळा झाल्यास सोड्याचा भाग जास्त आहे असें समजावें. पण असा साबण उपयुक्त आहे असें समजावें. गडद निळा झाल्यास सोड्याचा अंश जास्त आहे असें समजावें.

खोबरेलाचा साबण मिठाच्या पाण्यांत वितळत असल्यामुळें हा साबण करतांना सोडा व तेल अगदीं बिनचूक मोजून घ्यावें. साबू निरनिराळ्या प्रकारचें असतात. अंगास लावण्याचा, कपडे धुण्याचा, खरूजनाशक, खवडेनाशक, सुगंधी साबण, औषधी साबण, हजामतीचा साबण, दंतमंजनाचा साबण इत्यादि साबणाचे प्रकार असून त्यांत कित्येक उपप्रकारहि असतात.

कपडे धुण्याच्या साबूंत अल्कली थोडी जास्त टाकावी लागते. पण तो अधिक स्वस्त करण्यासाठी त्यांत सोड्याचे सिलिकेट, कार्बोनेट, (सल्फेट वगैरे क्षार, मीठ, खडू, शंखजिरें, तुरटी, कोंडा, चिकणी व चिनीमाती, लांकडाचें भूस, बटाट्याचें व धान्याचें पीठ, रेती, दगडाची भुकटी, गूळ किंवा साखर पाणी वगैरे घालतात; स्वस्त, हलके जिन्नस मिसळून त्याचें वजन वाढवितात. साबणासाठीं लहानमोठ्या कढ्या मिळतात. साबणाच्या ढेपीच्या पेट्या, साबण कापण्याचीं लांकडी यंत्रें, वड्या दाबण्याचें प्रेस, सांचे वगैरे साहित्य मेसर्स तांबट ब्रदर्स, एंन्जिनियर्स-ग्वाल्हेर येथें व मेसर्स आगलवाडा अॅन्ड सन्स, बंगलोर कौलांचे कारखानदार धारवाड ह्यांजकडे मिळेल.

साबणाच्या किंवा इतर कोणत्याहि धंद्यांत मुख्य ध्यानांत ठेवण्याच्या गोष्टी म्हटल्या म्हणजे कारखान्यास मुबलक जागा, भरपूर पाणी, तेल वगैरेंचा पुरवठा, विक्रीची सोय आणि माल पाठविण्यासाठीं स्टेशन किंवा बंदर जवळ ह्या होत. त्याचप्रमाणें माल तयार करतांना नेहमीं एकाच नमुन्याचा झाला पाहिजे. प्रसंगीं नुकसान झालें तरीं त्याच्या गुणधर्मांत फरक पडूं देऊं नये. प्रथमच माल बाहेर काढण्यापूर्वी महाग माल जितका कमी वापरतां येईल तितका वापरावा. व स्वस्त माल जितका जास्त वापरता येईल तितका चांगला. नवीन सुधारणा करणें झाल्यास पूर्वीचे गुणधर्म न वाढले तरी चालतील पण कमी होतां कामा नयें. नाहींतर गिर्हाईक विनाकारण नाखुष होईल व मालावरचा लोकांचा विश्वास कमी होईल. लोकांचा उत्तरोत्तर विश्वास वाढला पाहिजे असेंच धोरण स्वीकारलें पाहिजे. धुण्याच्या साबणाचे मोठे कारखानदार तेल स्वतः काढतात व अंगाला लावण्याच्या साबणाचे कारखानदार अत्तरें किंवा मसाल्याचीं तेलें स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात. ह्यामुळें त्यांनां साबण नेहमीं एकाच भावानें देतां येतो. [रा. स. बा. परांजपे व शं. य. गर्गे यांनीं पाठविलेल्या माहितीवरून]

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .