विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सादाबाद— संयुक्त प्रांतांत मथुरा जिल्ह्यांतील तहशील. क्षेत्रफळ १८० चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) १०८८८६. या तहशिलींत १२७ खेडीं व २ शहरें आहेत. तहशिलीच्या नैॠत्य दिशेनें यमुनानदी वाहते. १९०२ सालीं गंगानदीचा कालवा ह्या तहसिलींत सुरू झाला. मुख्य पीक कापसाचें आहे.