प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद

सातारा, जि ल्हा.— मुंबई, मध्यविभाग. याच्या उत्तरेस पुणें जिल्हा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस कोल्हापूर संस्थान व पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे. याची दक्षिणोत्तर लांबी १०० मैल व पूर्वपश्चिम रुंदी ८० मैल आहे. लोकसंख्या (१९२१) १०,२६,२५९. ह्या जिल्ह्यांत सह्याद्रीचें कमळगड, वैराटगड, भैरवगड, शंभू महादेवाचा व दातेगड फांटा असे ५ फांटे आहेत. सज्जनगड, अजिमतारा, पन्हाळा, कमळगड, मच्छींद्रगड, सदाशिवगड, दातेगड, वैराटगड, भैरवगड, पांडवगड, वासोटा इत्यादि किल्ले आहेत. लहानमोठ्या नद्या एकंदर ११ आहेत. कृष्णा ही सर्वांत मोठी नदी या जिल्ह्यांत १५० मैल वहाते. याशिवाय कोयना, वारणा, वेण्णा, नीरा माणगंगा, उरमोडी वगैरे नद्या आहेत. येथील हवापाणी चांगलें आहे. ऐन उन्हाळ्यांत ७६-८४ उष्णमान असतें, या जिल्ह्यांतील ठिकठिकाणीं पडणार्या पावसांत फार फरक आढळतो. सह्याद्रीचें उंच शिखर जें महाबळेश्वर येथें ३०० इंच पाऊस पडतो व फलटण संस्थानांत अगदीं थोडा पाऊस पडतो.

जमीन व पिकें:- सह्याद्रीच्या पायथ्याची जमीन मुरमाड आहे. मध्यभागांतील जमीन काळी आहे. पूर्वेकडे माळरान बरेंच आहे. ह्या जिल्ह्यांत पिकें विविध येतात. भात, राळा, वरी, नाचणी, वाल, वाटाणा वगैरे कोंकणी पिकें पुष्कळ पाऊस पडणार्या भागांत होतात. काळ्या जमिनींत शाळू, गहूं, हरभरा, तूर, बाजरी, उडीद, भुईमूग, मूग, चवळी वगैरे धान्यें पिकतात. माळरानांत अरगडी, डुकरी, कारळा, करडी, ताग, बाजरी, तूर इत्यादि धान्यें पिकतात. बागाईत जमिनींत ऊंस, हळद, विड्याची पानें व भाजीपाला होतो. शिवाय आंबे, केळीं, पेरू, द्राक्षें, डाळिंबें, लिंबें वगैरे फळेंहि होतात.

खनिजपदार्थ:- जावळी, पाटण, शिराळे, पेटा यांत लोखंड सांपडतें. पंचवीस वर्षांपूर्वी धावड लोक लोखंड काढून त्याचीं शेतीचीं हत्यारें करीत पण परदेशी स्वस्त मालामुळें त्यांचा धंदा बसला.

व्यापार व उद्योगधंदे:— जिल्ह्यांतील मुख्य धंदा शेतीचा. शेंकडा ७० लोक शेतकरी आहेत. कर्हाड येथें आगकाड्यांचा कारखाना आहे. सातार्यास तांब्यापितळेचीं लहानमोठीं भांडीं तयार करतात. माग तालुक्यांत बांगड्या तयार होतात. तासगांवरोडला सरकी काढण्याच्या दोन गिरण्या आहेत. इस्लामपूरला रेशमी मुकटे चांगल्यापैकीं तयार होतात. पळशीस घोंगड्याची पैदास होते. ह्या जिल्ह्यांतून धान्य, भांडीं, रेशमी कापड, घोंगड्या वगैरे वस्तू बाहेर जातात.

दळणवळण:— सदर्न-मराठा रेल्वेचा फांटा या जिल्ह्यांतून बेळगांवकडे गेला आहे. गाडी रस्त्यांत पुणें-सातारा नवा व जुना असे दोन्ही मार्ग प्रचारांत आहे. याशिवाय पंढरपूर, महाबळेश्वर, कोल्हापूर, चिपळूण, बेळगांव वगैरे गांवी जाण्याचे रस्ते आहेत.

राज्यव्यवस्था:— या जिल्ह्याचे ११ तालुके आहेत. इतर जिल्ह्यांप्रमाणें कलेक्टर जिल्ह्याचा मुख्य असतो. व त्यास मदतनीस म्हणून असिस्टंट व डेप्युटी कलेक्टर असतात. जिल्ह्यांत १२ म्युनिसिपालिट्या आहेत. जिल्हा व तालुका लोकलबोर्डे असून शाळा, सडका, दवाखाने वगैरे सार्वजनिक हिताचीं कामें बोर्डाच्या अधिकारांतलीं असतात.

इतिहास:— ख्रिस्ती शकापूर्वी २०० वर्षे येथें बौद्धांच्या वसाहती होत्या. ख्रि. पू. ९० पासून ख्रिस्तोत्तर ३०० पर्यंत आंध्रभृत्यांच्या ताब्यांत सातारा जिल्हा होता. यानंतर १४व्या शतकांत मुसुलमानांच्या ताब्यांत हा प्रांत जाईपर्यंत मधील कालांतील इतिहास उपलब्ध नाहीं. कांहीं ताम्रपटांवरून चालुक्य व राष्ट्रकूट घराण्यांच्या अंमलाखालीं सातारा असावा असें वाटतें. १२०० ते १३०० पर्यंत देवगिरीच्या यादवांच्या ताब्यांत सातारा होता. पुढें हसनगंगूच्या बहामनी राज्यांत सातारा मोडत असे. पुढें सन १४८९-१६८६ पर्यंत यावर आदिलशाहीचें राज्य असे. स. १७२० त हा मराठ्यांच्या ताब्यांत गेला व मराठेशाहीची प्रथम राजधानी तेथेंच होती. १८४८ सालच्या पुढें इंग्रजांच्या ताब्यांत सातारा गेला.

ता लु का.— सातारा जिल्ह्यांतील या तालुक्याच्या दक्षिणेस कर्हाड तालुका आहे. क्षेत्रफळ ३२० चौ. मैल असून लोकसंख्या (१९२१) १,१८,८९८ आहे. तालुक्याचें मुख्य ठिकाण सातारा आहे. सज्जनगड, यवतेश्वर, माहुली, कोटेश्वर, धावडशी वगैरे क्षेत्रें या तालुक्यांत आहेत. यांत एकंदर १४८ गांवें आहेत. कृष्णा व तिला मिळणार्या नद्या या तालुक्यांतून वहातात.

श ह र.— सातारा जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. अजिमतारा किल्ल्याच्या पायथ्याशीं हें शहर वसलें आहे. येथील हवा उत्तम असते. यवतेश्वर डोंगरावरील पाणी गावांत आणलें आहे. शहरांत म्युनिसिपालिटी (स्थापना १८५३) आहे. गांवाची लोकसंख्या (१९०१) २६,०२२. वाराच्या नांवावरून पडलेल्या ७ पेठा खेरीजकरून रामभाऊचा गोठ, यादवगोपाळ पेठ, व्यंकटपुरा, चिमणपुरा इत्यादि स्थलव्यक्तिविशिष्ट नांवें असलेल्या नऊ दहा पेठा आहेत. शहरांत पेशवाई काळांत बांधलेले ऐतिहासिक प्रेक्षणीय वाडे आहेत. कै. पारसनीस यांनीं संग्रहित केलेल्या ऐतिहासिक वस्तूंचें प्रदर्शन (म्युझियम) येथें आहे. शहर स्टेशनपासून १० मैल लांब आहे. सातारा हें लष्कराचें ठाणें आहे या ठिकाणीं दोन मोठीं हायस्कुलें चालतात.

इतिहास:— सातारा शहराचें शाहूनगर हें पूर्वीचें नांव होय. हें शहर शाहूमहाराजांनी वसविलें (१७२२ -ना. सा. रों.) याला जुन्या कागदपत्रांतून सप्तरूषी असें म्हटलेलें आढळतें. तेथें शाहूनें आपले राजवाडे बांधले व इतर सरदारांनींहि राजधानीचें शहर म्हणून तेथें वाडे बांधले होतेच. शाहूनें रंगमहाल बांधला पण तो पुढें जळाला. पेशव्यांचें व इतर काहीं सरदारांचे वाडे १७५३ सालीं होळीच्या रात्रीं आग लागून जळले, त्यानंतर पेशव्यांनीं वाडे बांधले नाहीं. यवतेश्वराच्या डोंगरांतून शाहूनेंच पाणी आणून तें शाहुनगरांत खेळविलें. येथील किल्ला पन्हाळ्याच्या दुसर्या भोजराजानें स. ११९० त बांधलेला आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .