विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
 
शकुंतला:- मेनका नामक अस्परेपासून विश्वामित्रास झालेली कन्या. लहानपणीं आईनें अरण्यांत टाकून दिली असतांना पक्ष्यांनीं कांहीं काळ हिचें रक्षण केलें म्हणून हिला शकुंतला हें नांव मिळालें. पुढें कण्व ऋशींनीं तिचें पालन केलें. हिचा दुष्यंताशी गांधर्वविवाह कण्वाश्रमांत झाला होता; पण कण्वाने तिला त्याच्याकडे पत्नी या नात्यानें पोंचविली असतां दुष्यंतानें लोकापवादास्तव तिचा प्रथम स्वीकार केला नाहीं, पण आकाशवाणीनें सांगीतल्यावर केला. शकुंतलेचा पुत्र भरत होय. महाकवि कालिदासानें दुष्यंतशकुंतलेची प्रेमकथा नाटकरूपानें उत्कृष्ट रंगविली असून तें शाकुंतल नाटक सर्वमान्य झालेलें आहे. व त्यांचीं निरनिराळ्या भाषांतून भाषांतरें व रूपांतरेंहि झालेली आहेत. [कालिदास व नाटयशास्त्र हे लेख पहा.]