विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्हेपिन:- मद्रास, कोचीन संस्थानांतील एक बेट. याची लांबी २४॥। मैल व रूंदी १ ३।८ मैल आहे. दक्षिणेकडील २३॥ एकराचा भाग इंग्रजाकडे असून उत्तरबाजू त्रावणकोर संस्थानाकडे आहे. एकंदर बेटाचें क्षेत्रफळ २२ चौरस मैल आहे. हें बेट नदीच्या गाळानें बनलेलें असल्याकारणानें त्यांत नारळाचें उत्पन्न अतिशय येतें. पूर्वी कालिकतचा झामोरीन व कोचीनचा राजा यांमध्यें नेहमीं भांडणें होऊन लढाईचे प्रसंग वारंवार या बेटावरच घडत. डच लोकांचें ठाणें या बेटावर होतें.