विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वूलवरहॅम्टन:- इंग्लंड, स्टॅफोर्डशायर परगण्यांतील बाजारगांव व म्युनिसिपल काउंटी आणि पार्लमेंटरी बरो. याची लोकसंख्या (१९०१) ९४१८७. हें शहर उंच व निरोगी अशा जागेवर बसलें आहे. येथें नगरभवन, बाजार, शेतकी, दिवाणखाना, मोफत ग्रंथालय व नाटकगृहें ह्या मुख्य इमारती आहेत. वूलवरहॅम्टनच्या दक्षिणेकडील व पूर्वेकडील जिल्ह्यांतून दगडी कोळसा व लोखंड यांच्या खाणी आहेत. कुलुपें, यंत्रें, हत्यारें व सायकली वगैरे वस्तू येथें तयार होतात. याशिवाय येथें जस्त व कथील यांचे कारखाने आहेत.