विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वीरावळ:- मुंबई, काठेवाड, जुनागड, संस्थानांतील एक बंदर व शहर. याची लोकसंख्या १९०१ सालीं १६७७५ होती. वीरावळच्या पश्चिमेस देवका नदी वाहत असून ती जटेश्वर महादेवाच्या देवळाजवळ समुद्रास मिळते. वीरावळचा व्यापार मस्कत, कराची व मुंबईशी पुष्कळ चालतो. अलीकडे बंदराची पुष्कळ सुधारणा झालेली आहे.