विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विराट:- पूर्व मत्स्यदेशाचा राजा. कैकेय राजाची कन्या सुदेष्णा याची स्त्री असून तिचा भ्राता महाबलाक्ष कीचक हा याचा सेनापति होता. यास शंख, श्वेत व उत्तर असे तीन मुलगे असून उत्तरा नांवाची एक कन्या होती. या राजाच्या घरींच पांडव अज्ञातवासांत असतांना राहिले होते. पांडवांच्या अज्ञातवासानंतर उत्तरेचा अभिमन्यूशी विवाह झाला. भारतीय युध्दांत विराट पांडवांकडेच होता. जयद्रथवधानंतरच्या रात्रीं झालेल्या युध्दांत द्रोणाच्या हातून यास मरण आलें.