विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूत्रपिंडदाह, ती व्र व दी र्घ दा ह.- हा रोग तीव्र व दीर्घकालीन अशा दोन स्वरूपांत नजरेस येतो. दोन्ही प्रकारच्या दाहांचीं साधारण लक्षणेंः- लघवींतून आल्ब्यूमिन नांवाचा सात्त्विक पदार्थ जाणें व त्याबरोबर रक्त व मूत्रनळयाच्या खरपुडया जाणें, जलोदर, रक्तशय व रक्तवाहिन्या यांत होणारा बदल, नेत्रांतील विकृति व मूत्रविषशोषण हीं आहेत. या रोगाचा पूर्ण शोध इंग्लंडांतील डॉक्टर ब्राइट यानें लाविला.
तीव्र दाहाचीं लक्षणें:- सर्दीमुळें प्रथम थंडी वाजून मोठा ताप योते, व डोकें दुखतें. चैन पडत नाहीं, घेर्या येतात; आणि उलटया होतात. कुशींत आणि पाठींत मूत्रपिंडाच्या ठिकाणीं वेदना होऊं लागतात. वृषणास सूज येऊन पीडा होते व त्यांतील गोळी कधीं वर चढते. कालचाल केल्यानें दुःख जास्त वाढतें. तहान फार लागते व शौचास अवरोध होतो. पुष्कळ वेळां लघवी करण्याची इच्छा होते परंतु ती अगदीं थोडी आणि अति लाल अगर काळसर लाल रंगाची होते.
रासायनिक परीक्षणः- लघवींत अल्ब्युमिन फार सांपडतें व तिचें विशिष्ट गुरुत्व १०२५-३० पर्यंतहि वाढतें. सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिलें असतां तींत रत्तचच्या लालपेशी (कण), फायब्रीन, एपिथियम् अथवा पुवाचे कण दिसतात. याशिवाय मुख्य लक्षण म्हणजे जलोदर व शरीर सुजणें. बरा होण्याचें लक्षण म्हणजे लघवी निवळूं लागून साफ व पुष्कळ होऊं लागते. आल्ब्यूमिन कमी कमी जाऊं लागून व सूजहि उतरूं लागते. दोन्ही मूत्रपिंड एकाच वेळीं बिघडले असले तर लघवीची उत्पत्ति उगदीच थांबते व रोगयास मूत्रविषबाधा होऊन बेशुद्धि येते व मृत्युहि येण्याचा संभव असतो.
दीर्घ दाहाची लक्षणें:- मूत्रपिंडदाह रोग पूर्ण बरा झाला नाहीं तर कायमचा होऊन त्यांतील लक्षणें नेहमींचीं होतात. शिवाय दुसरीं लक्षणें येणेंप्रमाणेंः- आल्ब्युमिन जाणें फारच कमी होतें. परंतु मूत्राशयांतील खरपुडया फार जातात. चेहरा पांडुर रंगाचा अथवा पांढर्या मेणासारखा तेजोहीन दिसतो. ताप नसतो. लघवी पुष्कळच होऊं लागते, हृदय बिघडून मोठें होतें. लघवीचें विशिष्ट गुरुत्व कमीच असतें (१००२-०५). अशक्तता फार येते, व रक्त अति पातळ होऊन बिघडतें.
उपचारः- तीव्ररोगांत मूत्रपिंडाचें अडलेलें कार्य दुसरया इंद्रियांच्या मागें करून घेण्यासाठीं रेचक व स्वेदक औषधें द्यावींत व पाठीवर मूत्रपिंडाच्या स्थानाच्या वर गरम शेक करावा अथवा मोहरीचा लेप द्यावा. पण क्यांथ्यारीडीसचें पलिस्तर मात्र मारूं नये. रोग्यास अंथरुणांत निजवून ठेवावा. कपडे गरम घालावेत. खाण्यापिण्यास फक्त दूध व कांजी द्यावी. पचत नसेल तर दूधपणा गरम करून द्यावें. साधें स्वच्छ पाणी पुष्कळ द्यावें. उतार पडल्यावर लोहयुक्त रक्त सुधारण्याची औषधें द्यावींत. सर्दीस फार जपावें. मांस व दारू वर्ज्य करावीं. दीर्घदाहासहि हेच उपचार करावे. मेंदूस विश्रांति द्यावी घाम निघेल व रेच होतील अशीं औषधें द्यावी. दुधावर न रहातां आल्यास पिष्ठान्नाहारावर रहावें.