विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुद्देबिहाळ- मुंबई इलाखा, विजापूर जिल्ह्याचा पूर्वेकडील तालुका. याचें क्षेत्रफळ ५६९ चौ. मैल असून लोकसंख्या (१९११) ८९४८७ आहे. यांत मुद्देबिहाळ गांव व एकंदर १५० खेडीं आहेत. या तालुक्याचा उत्तर भाग चांगला सुपीक आहे. मुद्देबिहाळ गांव सदर्नमराठा रेल्वे सदर्नमराठा रेल्वेच्या अलिमत्ती स्टेशनापासून १८ मैलांवर आहे. इ. स. १६८० त हल्लीच्या बसरकोट येथील नाडगौंडाच्या पूर्वजांपैकीं परमन्ना यानें बसविलें. याचा मुलगा हकप्पा यानें इ. स. १७२० त येथील किल्ला बांधिला. इ. स. १७६४ त पेशव्यांच्या अंमलाखालीं जाऊन सरतेशेवटीं इ. स. १८१८ त हें खेडें ब्रिटिश सरकारच्या सत्तेखालीं आलें.