विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुकडेन (चिनी नांव शेंगकिंग)- मांचुरियाची राजधानी. ही हुन-हो नदीवर वसलेली आहे. येथील लोकसंख्या २५०००० असून हें व्यापाराचें केंद्र आहे. पूर्वी मुकडेन हें मांचु घराण्याचें रहाण्याचें मुख्य ठिकाण होतें. शहराच्या मधोमध एक लहान राजवाडा आहे. येथें नॉर्थ ईस्टर्न (ईशान्य) युनिव्हर्सिटी आहे. रुसोजपानी युद्धांत (१९०५) मुकडेनच्या जवळ भयंकर युद्ध झालें, त्याला मुकडेनची लढाई असें म्हणतात.