विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माही- ही मद्रास इलाख्यांत मलबार प्रांतांत फ्रेंचांची एक वसाहत आहे. ही माही नदीच्या मुखाजवळ वसलेली आहे. लोकसंख्या (१९२३) ११४०१. ही वसाहत सध्यां भरभराटींत नाहीं. हा मुलुख डोंगराळ पण यावर नारळाचीं झाडें दाट आहेत. येथील जमीन सुपीक असून हवाहि निरोगी आहे. या वसाहतीचा मुख्य अधिकारी पांडिचेरीच्या गव्हर्नराच्या हाताखालचा असतो. येथें ब्रिटिश सरकाराचें एक पोस्टऑफिस आहे. कालिकतहून निघालेला आगगाडीचा फांटा अगदीं माहीजवळून जातो.