विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मावळ- (१) घाटमाथा व सह्याद्रि पर्वत यांच्या मधील घाटमाथ्याच्या पश्चिमेकडील (मावळत्या दिशेकडील) जो खोर्यासारखा प्रदेश तो मावळ. हें नांव बरेंच जुनें आहे. जुन्नर व पुणें या प्रांतांत एकंदर २४ मावळें आहेत. 'बारा मावळें' (ज्ञा. वि. १७) पहा.
(१) ता लु का- मुंबई, पुणें जिल्ह्याचा एक तालुका. क्षेत्रफळ ३८५ चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें ७० हजार. यांत लोणावळें व तळेंगांव-दाभाडे हीं दोन गांवें व १६२ खेंडीं आहेत. यांत जंगल साधारण बरें असून यांतून इंद्रायणी व आंध्रा ह्या दोन नद्या वहातात. यांत मुख्य उत्पन्न भाताचें आहे. वडगांव हें या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे.