विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मालेगांव- मुंबई इलाखा, नाशिक जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ७७७ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें एक लाख. हा तालुका सपाट असून यांत झाडी नाहीं. हवापाणी निरोगी आहे. मुख्य नदी गिरणा. मालेगांव हें या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. गावाची लोकसंख्या सुमारें २० हजार असून येथें ३००० वर हातमाग चालतात. येथें म्युनिसिपालिटि आणि एक जुना किल्ला आहे.