विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मार्मागोवें- गोवें, सासष्टी जिल्ह्यांतील द्वीपकल्प, खेडें व बंदर खरें नांव मुरगांव. हे द्वीकल्प गोवें बंदराच्या दक्षिणेस आहे. यावर दाट जंगल असून समुद्राकडील बाजूनें तें फार भव्य दिसतें. सध्यां हें व्यापाराचें महत्त्वाचें ठिकाण आहे. येथूनच मुंबईचा माल बेळगांवास जातो. मुरगांवची कारकून मंडळी शेजारच्या वास्कोडगामा गांवीं रहातात. तेथेंच स्टँडर्ड आईल कंपनीचें ऑफिस आहे.