विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मारकी- वर्हाड, जिल्हा उमरावती, तालुका उमरावती. हें लहानसें खेडेगांव आहे. येथें मारकीनाथाच्या (पहा) नांवानें चैत्री पौर्णिमेला व त्यापूर्वी तीन दिवस मोठी जत्रा भरते. गांवापासून जवळच श्रीरुद्रनाथाचें देऊळ आहे. त्याशिवाय श्रीरामकृष्णनाथाचीहि समाधि आहे. ह्या ठिकाणीं मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी व पौर्णिमा ह्या दिवशीं होम होत असून प्रतिपदेस गोपाळकाला होत असतो. हें संस्थान असून त्याला लगतचेंच एक शेत इनाम आहे.