विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायूराज- कवि व नाटककार. हा कल्चुरी वंशाचा रजपूत होता. कल्चुरी राजांनीं चेदि (हल्लीचा वर्हाड व मध्यप्रांताचा उत्तर भाग) देशावर राज्य केलें; या राजवंशांत हा झाला असावा, यानें रामकथेवर एखादें नाटक रचलें असावें पण तें उपलब्ध नाहीं पण या नाटकांतलें उतारे मात्र साहित्यदर्पण, दशरूपावलोक व राजशेखराच्या ग्रंथांत आढळतात. राजशेखराचा काल डॉ. भांडारकर यानीं इ. स. ८८४-९५९ याच्या दरम्यान ठरवला आहे, तेव्हां मायूराजाचा काल ७५०-८८० च्या दरम्यान असावा असें विद्वानांचें मत आहे.