विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायफळ- एक झाड. हें मध्यम उंचीचें झाड अथवा झुडूप असून मूळ ग्रीस, आशियामायनर, सीरिया व इराणपर्यंतचा प्रदेश यांत आढळतें. या देशांतूनच मायफळ हिंदुस्थानांत येतात. हीं मायफळें म्हणजे या झाडाच्या फांद्यांनां भोकें पाडणार्या किडयांनीं आपलें रज ठेविलेल्या गांठी होत. रंग व औषध यांकडे यांचा फार उपयोग होतो. रंग बसण्याकरितां मायफळें पाण्यांत उकळवून एकचतुर्थांश पाणी राहिल्यावर त्यांत रंगविण्याचा कपडा बुडवितात. मायफळाची पूड अथवा त्याचा लेप यांचा औषधांत उपयोग होतो.