विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माणगांव- मुंबई. कुलाबा जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ३५८ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ८४२०८. यांत २२५ खेडीं असून गांव एकहि नाहीं. माणगांव हें या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. यांतील तळयाचा डोंगरी किल्ला व मांदाडाजवळचीं लेणीं पाहण्यासारखीं आहेत.