विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँटगॉमेरी, जि ल्हा व ता लु का.- पंजाब, मुलतान डिव्हिजनमधील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ ४३१८ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ७१३७८६. माँटगॉमेरी, ओकर, दिपलपूर व पकपट्टण हे या जिल्ह्याचे चार तालुके असून जिल्ह्यांत एकंदर तीन शहरें व १८३५ खेडीं आहेत. सर रॉबर्ट माँटगॉमेरी या लेफ्टनंट गर्व्हनराच्या नांवावरून या जिल्ह्याला हें नांव मिळालें आहे. या जिल्ह्याच्या आग्नेयीस सतलज व वायव्येस रावी नदी वहात गेली आहे. ज्या भागाला कालव्याचें पाणी मिळतें तेवढा भाग वगळतां बाकी सर्व जिल्हा वालुकामय आहे. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा बराच मागासलेला आहे. तालुक्याचें क्षेत्रफळ १५५८ चौरस मैल व लोकसंख्या ४५०९४ आहे. त्यांत माँटगॉमरी व कमालिया हीं दोन शहरें असून ५९५ खेडीं आहेत.