विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांगल संस्थान- पंजाब सिमल्याच्या डोंगराळ संस्थानापैकी एक क्षेत्रफळ १२ चौरास मैल लोकसंख्या (१९२१) ११९३. येथें पहिल्यानें मारवाडांतील रजपूत आले. हें प्राचीन काळी विलासपूरचें मांडलिक होतें. पुढें स. १८१५ हें स्वतंत्र झालें. याचें उत्पन्न सुमारें १२०० रुपये आहे. येथील मुख्य उत्पन्न धान्य व अफूचें आहे.