विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँगने संस्थान- ब्रह्मदेश. दक्षिण शान संस्थानांतील एक क्षेत्रफळ. २७१७ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें ४४०००. या संस्थानांत एकंदर ९८१ खेडं आहेत. राजधनीचें ठिकाण नॅमटाँगज माँगने येथें आहे. पूर्वी दक्षिण शान संस्थानांत हें एक मोठें शहर होतें. व सध्यांहि याला बरेंच महत्त्व आहे. यांचें उत्पन्न सुमारें ५०००० रु. आहे.