विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँगकंग संस्थान- ब्रह्मदेश, दक्षिण शान संस्थानांतील एक संस्थान. क्षे. फ. १५९३ चौरस मैल. येथें मेयोझा लोकांची वस्ती आहे. हा सर्व टापू लागवडीचा असून येथे लोकसंख्या फार दाट आहे. याच्या पश्चिम भागांतून नामल्यांग नांवाची नदी वहाते. या संस्थानांत एकंदर ६२५ खेडीं असून याची लोकसंख्या सुमारें ३५ हजार आहे.