विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माकमइ संस्थान- ब्रह्मदेश. दक्षिण शान संस्थानांच्या पूर्वविभागांतलें एक संस्थान. क्षेत्रफळ २२०० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ३१८९२. यांत ४३३ खेडीं असून या संस्थानाची राजधानी माकमइ आहे. संस्थानाचें उत्पन्न सुमारें ५०००० रुपये आहे.