विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महेंद्रगिरि- हे गंजम जिल्ह्यांतील पूर्वंघाटाचें एक शिखर होय. या शिखरावर महेंद्रतनय नांवाच्या दोन प्रवाहाचें उगमस्थान आहे. येथें प्रचंड शिलांचीं तार देवळे आहेत. त्यांत कांही शिलालेख आहेत. या लेखांवरून असें दिसतें कीं येथें चोळ देशाच्या (राजानें) राजेंद्रानें १०१५-१०२२ च्या सुमारास एक जयस्तंभ बांधिला होता. जागदरम्यान परशुराम येथे संचार करतो म्हणून स्थानिक आख्यायिका आहे.