विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महू- इंदूर संस्थानांतील ब्रिटिश लष्करी छावणीचें ठिकाण. लोकसंख्या सुमारें ३००००. ही छावणी १८१८ सालीं सर जॉन मालकम यानें मंडलेश्वराच्या तहान्वयें बसविली. १८५७ सालच्या बंडांत येथेंहि बंडाळी माजली होती. परंतु लवकरच ती मोडून शांतता प्रस्थापित करण्यांत आली. या छावणीची व्यवस्था इतर ठिकाणच्या ब्रिटिश लष्करी छावण्यांप्रमाणें आहे.