विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महामारी (पटकी, विषूचिका)- हा एक विशिष्ट जंतूमुळें उद्भवणाऱ्या साथीचा रोग आहे. यांत साधारणतः पुढील लक्षणें आढळतात- मोठामोठाले पाण्यासारखे रेच, वाति, हातापायांत गोळे येणें, लघवी बंद होणें व शक्तिपात होऊन हातपाय गार पडणें.
रो ग जं तू चें व र्ण न.- हा जंतु कॉक या शास्त्रज्ञानें १८८३ या वर्षी शोधून त्याचें वर्णन प्रसिद्ध केलें, व त्याचें नांव त्याच्या आकारावरून कॉमॉबॅसिलस (स्वल्पविरामजंतु) ठेविलें. हा जंतु वक्राकार जंतूच्या जातींपैकीं असतो. हा रोग्यास झालेल्या रेचामध्यें अगर मृत्यूनंतर आंतडयांतील मळामध्यें व स्लेष्मावरण त्वचेमध्यें सांपडतो परंतु रक्तांत मात्र सांपडत नाहीं. हा क्षयजंतूसारखा वक्र परंतु मध्यें जरा जाड असून याच्या दोन्हीं टोंकांस एक अगर दोन पुच्छें असतात. याचीं वाढ आंतडयांतील पोकळ भागांत, त्यांतील पिंडांत, श्लेष्मावरण त्वचा आणि तिच्यावरील एपिथोलिअममध्येंहि झपाटयानें होते. त्यापासून विषोत्सर्जन होत गेलें म्हणजे या रोगाची लक्षणें होण्यास सुरवात होते अशी कल्पना आहे.
रो ग प्र सा रा चीं का र णें.- हीं बहुतेक विषमज्वराप्रमाणेंच असतात. पिंण्याचें, स्वयंपाकाचें, अगर आंघोळीचें पाणी या जंतूंच्या योगानें दूषित होऊन अन्नमार्गांतून त्यांचा प्रवेश हातो. असल्या रोगाचे कपडे नदी, विहिरी, तळी, या ठिकाणीं धुतल्यानें अगर मोरींतील मलयुक्त पाणी त्यांत झिरपल्यानें पाण्यापासून संसर्ग होतो. मलावर बसलेल्या माशा खाद्य अगर पेय पदार्थावर बसून संसर्गप्रसार करतात हेंहि सिद्ध झालें आहे. या रोगानें बरी झालेलीं माणसेंहि रोगप्रसारास कारण होतात. डोंगरावर हा रोग क्वचितच पहाण्यांत येतो. एकदां सांथ सुरू झाली म्हणजे सर्व वयाचे व दर्जाचे अगर जातीचे स्त्रीपुरुष बळीं पडूं लागतात. उन्हाळा व पावसाळयाच्या आरंभी या सांथी बहुधां असतात. फाजील आहार हेंहि या रोगास बहुधां निमित्त होतें. एकदां हा रोग झाला असतां अंगांत रोगप्रतिबंधक शक्ति येऊन पुन्हां रोग होत नाहीं.
रो गा चा क्र म व ल क्ष णें.- रोगाची गर्भावस्था बहुधां एक अगर दोन दिवस असते. रोगास आरंभ होतांनां कधीं कधीं पूर्व चिन्हावस्थेमध्यें रोग्यास साधे जुलाब प्रथम होतात, किंवा ते न झाले तर रोग्यास अस्वस्थता वाटून तो मलूल होतो. चक्कर, डोकें दुखणें, कानांत नाद ऐकूं येणें, अगर पोटांत कसेसें होऊन चैन न पडणें असें एकपासून तीन दिवसपर्यंत होत असतें. नंतर एकदम मोठमोठाले रेच होऊं लागून त्यांतील पिंवळेपणा नाहींसा होतो, व ते तांदुळाच्या धुवणाच्या रंगासारखे दिसतात. थोडया मिनिटांत घागरभर पाण्याइतके रेच होऊन दोन तीन तासांत तर याच्या तिप्पट अगर चौपट पाणी शरीरांतून रेच होऊन निघून जातें. हें रेच अल्कलीरूप असतात व त्यांत मीठ, अल्ब्यूमिन व श्र्लेष्मल पदार्थ असतात.
एखादा दुसरा तास याप्रमाणें जुलाब होऊन नंतर वांतीस आरंभ होतो. प्रथम अन्न पडून जाऊन नंतर तांदुळाच्या धुवणासारखी वांति पुष्कळशी विशेष त्रास झाल्याशिवाय वरच्यावर होते. रोग्यास दुसरें कांहीं खाणेंपिणें नकोसें होऊन कोरड पडून त्यास अति तृष्णा लागते. जीभ कोरडी व पांढरी होते. पोट हातानें थोडें दाबलें असतांहि सहन होत नाहीं. बहुधां बऱ्याच रोग्यांनां पायांतून वेदनायुक्त गोळे येऊं लागतात. व नंतर क्वचित् प्रसंगीं हातांत व इतर भागांतहि ते येतात. नंतर रोग्याचा शक्तिपात होऊं लागतो व पुढील स्थित्यंतर होतें :- शरीर काल्यासारखें थंडगार पडत जाऊन त्याचा वर्ण काळानिळा दिसतो. नाकहि फार गारठून काळेंनिळें होतें, व अशीच स्थिति हातापायांची व चेहऱ्याची होते. श्वासदेखील उष्ण न येतां थंडगार योते. कांखेंत तापाची नळी लाविली असतां नेहमीच्या उष्णमानापेक्षां (९८.४˚) ४-५˚ अंश उष्णतेचें मान कमी असतें. पण गुदद्वार अगर योगीमध्यें नळी लाविल असतां उष्णमान १०२˚ ते १०४˚ असलेलें आढळतें. जे रोगी कष्टसाध्य किंवा असाध्य असतात, त्यांचे डोळे रुक्ष, पांडुर व निस्तेज दिसतात. नाडीची गति शीघ्र होऊन ती बारीक सुतासारखी व अति मंद चालते. दर मिनिटास ३५ ते ४० पर्यंत श्वासोच्छ्वासाचें मान चढून दम लागल्यासारखें वाटतें. श्वासहि वरवर येऊं लागतो. नाडीचें मान दर मिनिटास ९०-१०० असतें. शरीरांतील मांसल भाग अगदीं दुर्बल होऊन निश्चेष्ट पडतात. उलघाल फार होते. आवाज घोगरा किंवा कानांत बोलल्याप्रमाणें बारीक होतो. या स्थितीमध्यें रेच बंद झालेले असतात. परंतु वांति मात्र सुरू असतें. लघवी कमी होत जाऊन शेवटीं नाहींशीं होते. रक्त दाट होऊन त्याचें विशिष्टगुरुत्वहि वाढतें. त्यांतील पेशीमध्यें रत्तरंग वाढतो व पांढऱ्या पेशींची संख्याहि वाढते. रक्ताचा अल्कलीपणा नेहमीपेक्षां आणखी कमी होतो. रोगी जरी त्रासून निश्चेष्ट पडलेला असतो तरी त्यास शुद्धि चांगली असते. ही स्थिति येण्यास सुरवातीपासून सुमारें दहा अगर सात तास लागतात, आणि ही अशी स्थिति बारा ते चोवीस तास सुमारें असते, व त्यांत उतार न पडतां रोगी गतप्राण होण्याचाहि संभव असतो.
परंतु ज्या रोग्यांनां उतार पडण्यासारखा असतो त्यांस या स्थितिनंतर किंचित् १०१˚-१०२˚ पर्यंत येऊन अंग गरम लागते व त्यांची कांति पूर्व रंगास येण्याच्या पंथास लागते. नाडी हातास चांगली चालत असलेली आढळून येते. ज्वर बरा होऊन रोगी बहुधां बचावतो.
भे द.- या रोगांत भेद व उपभेद पुष्कळच असतात; उदा. (१) सौम्य प्रकारः- यांत फक्त रेच होतात व नंतर ते कमी आणि नंतर अगदीं बंद होऊन उतार पडतो. (२) विषूचिकासदृशातिसार- यांत मागील प्रकारापेक्षां लक्षणें अधिक तीव्र असतात. पण हीं लक्षणें थोडया दिवसांत अगर एक दोन आठवडयानंतर थांबतात. (३) लघुविषूचिका- याचीं लक्षणें एकाएकीं व अकल्पितरीतीनें सुरू होतात, व तीं खऱ्या विषूचिका रोगाप्रमाणेंच बहुतेक असतात. उतार सावकाश पडत जातो. (४) निर्जलविषूचिका- या भेदामध्यें शक्तिपातावस्थेसच एकदम आरंभ होऊन रोगी थंडगार पडून मृत्युपंथास लागतो. (५) प्रत्यागतविषूचिका- या प्रकारांत जी परावर्तन स्थिति इतर प्रकारच्या रोग्यास येते ती नीटशी येत नाहीं. (६) उग्रविषूचिका- या प्रकारांत ज्वर अतिशय वाढून त्याबरोबर लालसर किंवा गुलाबी गर कधीं गांधी उठल्यासारखा पुरठ उठतो. यानंतर विषमविषूचिका नांवाची भयंकर अवस्था कधीं कधीं सुरू होण्याचा संभव असतो. ती अशी-रोग्याच्या आरंभापासून सुमारें एक आठवडयानें ही स्थिति प्राप्त होते. हातापायांत अगदी निर्जीवित्व, निर्बलत्व प्राप्त होऊन रोगी निश्र्चेष्ट पडतो. तोंड लाल दिसतें, डोकें दुखतें, जिभेवर बुरशी व भूक नाहिंशी होतें. कोरडया ओकाऱ्या अगर खरोखरी वांतीसहि सुरवात होते. रेच सुरू असतात पण एखाद्या वेळीं उलट शौचाचा अवरोध झालेला असतो. चक्कर फार येते व त्यापासून रोग्यास चैन पडत नाहीं. मग त्यास प्रथम सुस्ती येते. अगर गुंगीहि येते. ज्वर १०२०-१०३० पर्यंत वाढतो. नाडी बारीक व अशक्त होते, व रात्रीं वात होऊन रोगी थोडा बरळतो. लघवीमध्यें अल्ब्यूमिन सांपडतें. (७) मूलविषशोषणविषूचिका- यांत शक्तिपातावस्थेनंतर गुंगी, उलघाल होणें, आपल्याशींच वात होऊन पुटपुटणें, आंचके येणें व बळकट बेशुद्धि ही लक्षणें होतात. हीं अवस्था दोन ते ९ दिवसपर्यंत टिकून नंतर बहुधां मृत्यु येतोच.
रो गां त उ द्भ व णा रे आ गं तु क दो षः- हे रोग सुरू असतांना अगर मागाहून रोगी निःशक्त स्थितींत असतांना उद्भवतात, ते असेः- श्वासनलिकादाह, कफोदर, फुफ्फुसदाह, फुफ्फुसावरणदाह, गलदाह, कंठदाह, मूत्राशयदाह, योनिदाह, मस्तिष्कावरणदाह, संधिवात, कर्णपार्श्वग्रंथिदाह, लिंग, वृषण व नाक हीं त्वरित कुजून विगलित व दुर्गंधियुक्त होणें, अक्षिपुटदाह, शक्तिपातावस्थेंत डोळे आपोआप फार वेळ उघडे राहिल्यानें अक्षिकांचदाह व अक्षिकांचकलुषता, शय्याक्षते इत्यादि रोग उत्पन्न होतात.
रो ग नि दा न.- हा रोग सौम्य प्रकारचा झाला असतांना त्याचें पूर्ण सदृश्य अजीर्णोद्भूत अतिसाराशीं अगर नासकें अथवा अंबलेलें जडान्न खाऊन (उदाहरणार्थ, दूध, श्रीखंड) झालेल्या अतिसाराशीं असतें. म्हणजे या दोहोंतहि हातपाय गार पडणें, शक्तिपात, ग्लानि, थोडी लघवी व पांढरे जुलाब होतात. पण हीं लक्षणें फक्त एकाच माणसास अगर कुटुंबास झाल्यामुळें निदानास पुष्टि मिळते. सोमलाची विषबाधा झाली असतांहि हुबेहुब अशींच लक्षणें होतात. खात्रीचें निदान ठरविण्यास रेचाचें सूक्ष्मदर्शकयंत्रानें परीक्षण व जंतूचें जंतुशास्त्ररीत्या परीक्षण करावें.
उ प चा र.- सांथीच्या दिवसांत जुलाब होतांक्षणीं अफुमिश्रित अवष्टंभक मिश्रणें अगर पुडया अगर गोळया रोग्यास देण्याचा प्रघात आहे. पण हीं औषधें देणें असल्यास रोगाच्या अगदीं प्रथमावस्थेंतच द्यावयाचीं असतात. पण जर कां एकदां पुढील शक्तिपातावस्थेस आरंभ झाला तर त्यावेळीं अफु व अवष्टंभक औषधें रोग्याच्या प्रकृतीस अपायकारक होतात. त्यांचा उपयोग होत नाहीं, इतक्यावरच भागत नाहीं. उत्तम उपाय म्हणून शिरांतून अमृतजल (लवणांबु) सुईनें टोंचून घालतात व पोटामध्यें परमॅग्यानेटयुक्त औषध देतात. टोंचलेल्या पाण्याच्या योगानें रत्तचभिसरणाचा नष्ट झालेला जारे पूर्ववत् होण्याच्या मार्गास लागतो व पोटांत दिलेल्या औषधानें या महामारीच्या जंतूंनीं पोटांत व आंतडयांत उत्पन्न केलेल्या विषाचें निराकरण व मारण होतें. टोंचून औषध घालतात त्याचें प्रमाण शुद्ध मीठ १२० ग्रेन, पोटयाशियम क्लोराइड ६ ग्रेन, क्यालशियम क्लोराइड ४ ग्रेन व उकळून थंड केलेलें पाणी २० औंस जसें आहे. दंडांतील शिरेमध्यें असें तयार केलेलें औषध शेर किंवा सव्वा शेरपर्यंत जाऊं द्यावें. बहुधां एकदां टोंचणें पुरें होतें. पण पुन्हां शक्तिपात झाला तर दुसऱ्यांदां टोंचावें हें बरें. जर रत्तचभिसरणभार अगोदरच ठीक असेल (म्हणजे ८० मिलिमिटरपर्यंत) तर हें पाणी त्वचेखालीं टोंचावें. शिरेंत टोंचून घालीत नाहींत. टोंचून घालण्याच्या औषधाचें उष्णमान कोमट म्हणजे १००˚ फा. ही. सुमारें असावें. जर गुदद्वारांत उष्णता याहून अधिक असेल तर याहूनहि कोमट औषध टोंचून घालावें, म्हणजे परावर्तन-स्थितीमध्यें बेतापेक्षां अधिक ज्वर येणार नाहीं. उलटपक्षीं गुरद्वारांत उष्णमान बरेंच कमी असल्यास टोंचावयाच्या औषधाचें उष्णमान अंमळ कडक असावें. पोटामध्यें परमँग्यानेट हें औषध देण्याच्या दोन तऱ्हा आहेत. (१) कॅलशियम परमँग्यॉनेट अर्धा ते एक ग्रेन हें वीस औंस गरम पाण्यांत विरघळून तें पाणी जाईल तितकें वरच्यावर रोग्यास पाजावें. यापेक्षांहि जास्त प्रमाण पुढें म्हणजे चार ते सहा ग्रेनपर्यंत वाढवावें. (२) किंवा फक्त आतडयांतच विरघळणाऱ्या केराटिनचें पूट दिलेल्या या औषधाच्या गोळया दर १५ मिनिटांनीं एक याप्रमाणें दोन तासपर्यंत ८ गोळया द्याव्या नंतर रेच हिरव्या रंगाचे व लहान होईपर्यंत गोळया दर अर्ध्या तासांनें द्याव्यात. याला सुमार १२ तास लागतात. त्यानंतर सबंध दिसांत व त्याच्या दुसऱ्या दिवशीं दररोज ८ गोळया पोटांत द दोन अगर तीन तासांनीं देत असावें. या स्थितीमध्यें डॉ. रोजर्स हे बारली धान्याच्या कषायाखेरीज दुसरें कांहीं पिऊं देत नाहींत. विशेषतः त्यांच्या मतें मांसाचे सूप (रसा) किंवा मद्याकमिश्रित उत्तेजक पेयें अगदीं वर्ज असावींत. बाहेरून कढत पाण्याच्या बाटल्या किंवा जड पांघरुणें हेंहि उपयोगीं नाहीं, कारण परावर्तन फार जोरानें होऊन फाजील ज्वरोत्पत्ति होण्याचें भय त्यानें असतें, व यामुळें एखाद्या वेळेस काळजी उत्पन्न करण्यासारखी रोग्याची स्थिति होते. शिरांतून हें औषध टोंचलें म्हणजे थोडा ज्वर येण्याची प्रवृत्ति अगोदरच असते. ही परावर्तनस्थिती वाजवीपेक्षां जास्त थरावर जात आहे असें वाटल्यास डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. थंड पाण्यानें सर्वांग मधून मधून पुसून काढावें. स्पजांचे मोठे तुकडे किंवा खादीचे रुमाल थंड पाण्यांत पिळून काढून त्यानें हें करतां येतें. वर सांगितलेल्या औषधांत बर्फ घालून ते गुदद्वारांत बस्तिरूपानें हळू हळू व थोडथाडें घालावें. एक दोन दिवस खाण्यास फक्त वर सांगितलेला बारली धान्याचा कषाय देणें; त्यानंतर, आरारूट, तवकील, ताजें ताक अथवा दूध हीं आवडीप्रमाणें देत जावीं. मूत्रविषशोषणविषूचिका म्हणून जो वर भेद सांगितला आहे तशी स्थिति येऊं नये म्हणून लघवी पुन्हां साफ व पुष्कळ होऊं लागेपर्यंत हें औषध शिरांतून टोंचीत असावें, किंवा त्वचेखालीं टोंचावें असें डॉ. रोजर्स यांचें मत आहे. हृदयक्रिया शाबूत ठेवण्यासाठी डिजिटालीस, आड्रिनाली, व पिच्युइटारियाचा अर्क ही टोंचून घालावीं व कमरेच्या ठिकाणीं घटिकाचूषण करावें. डॉक्टर याच औषधांत यासाठीं शुद्ध मीठ ६० ग्रेन आणि सोडाबायकार्बोनेट १६० ग्रेन व २० औंस पाणी हें पूर्वी सांगितलेल्या औषधांतच मिसळून टोंचीत असतात.
प्र ति बं ध क उ पा य.- विषमज्वर व आमातिसार हे रोग ज्या मार्गानें पसरून संसर्ग वाढत जातो, त्याच मार्गानें हा रोग पसरत असल्यामुळें त्या सर्वांचे प्रतिबंधक उपाय सारखेच आहेत; उदा. पिण्याचें पाणी व मोऱ्या स्वच्छ ठेवणें, रोग्याच्या मलमूत्रांत जंतुघ्न औषध टाकून नंतर ते मोरींत टाकणें, मलमूत्रानें खराब झालेले कपडे सावधगिरीनें धुणें, सर्वांनीं पाणी कढवून मग तें पीत जाणें व एकंदरीत अति स्वच्छता राखणें हे वैय्यक्तिक प्रतिबंधक उपाय करण्यासारखे आहेत. सार्वजनिक उपाय म्हणजे जेथें रोग आहे असे ठाऊक आहे तेथून येणारास कांहीं दिवस वेगळें ठेवावयाचें, पण हा उपाय अंमलांत आणण्यास त्रासदायक व अवघड आहे. फक्त असें करणेंच शक्य आहे कीं, ज्या वाहनांतून अगर आगगाडीच्या डब्यांतून किंवा आगबोटींतून रोगी उतरला असेल, त्यानें दूषित केलेली जागा जंतुघ्न द्रव्यांनीं शुद्ध करणें, व त्या रोग्यास ठेवून घेऊन त्यास उपचार करणें व उतारू तपासण्यासाठीं डॉक्टरची योजना करणें, या उपायांनीं रोगाच्या पसरण्यास चांगला आळा बसतो. हा रोग न होण्यासाठीं हॉफकिन या प्रसिद्ध रशियन डॉक्टरनें प्रतिबंधक लस शोधून काढली आहे व ती या देशांत निदान यूरोपीय लोकामध्यें टोंचून घेण्याचा प्रघात बराच आहे.