विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाजन, गोविंद विठ्ठल (१८१५-९०)- यांच्या घराण्याचें जुनें आडनांव कुंटे होय. मुंबई येथील अगदीं पहिल्या 'दर्पण' नांवाच्या वृत्तपत्राचे हे कर्ते होते.यानीं 'दिग्दर्शन' नांवाचें एक शास्त्रीय विषयांचें मासिक, पुढें 'प्रभाकर' व 'धुमकेतू' नावांचींहि पत्रें, नंतर 'ज्ञानदर्पण' नांवाचें त्रैमासिक चालविलें होतें; शिवाय 'उपदेश चंद्रिका' नांवाचेहि एक मासिक यांनीं चालविलें होतें. यांचें एक पुस्तक म्हटलें म्हणजे ''शब्दसिद्धिषनबंध'' होय. यानीं आपल्या वयाचा उत्तरकाल नागपूर येथें घालविला. यांचे चिरंजीव नागपुरास प्रसिद्ध वकील होते (वि. वि. पु. २२, अं १।२)