विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलबारी, बेहरामजी(१८५३-१९१२)- एक हिंदी वृत्तपत्रकार व चळवळया सुधारक. हा बडोदें सरकारच्या नोकरींत असलेल्या एका गरीब फारशी गृहस्थाचा मुलगा होता. १८७५ सालीं त्यानें गुजराथीमध्यें आपला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. १८७७ सालीं त्यानें 'दि इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब' हा ग्रंथ प्रसिद्ध केला व त्यामुळें त्याची इंग्लंडमध्यें प्रसिध्दी झाली. स. १८०० मध्यें 'इंडियन स्पेक्टेटर' हें पत्र ताब्यांत घेऊन त्यानें तें सुमारें २० वर्षें अव्याहत रीतीनें चालविलें. १९०१ सालीं तो 'इस्ट अँड वेस्ट' मासिकाचा संपादक झाला. राजकीय गोष्टींत तो नेहमीं तटस्थ रहात असे. पण सामाजिक बाबींत मात्र तो आपलीं मतें निर्भिड तऱ्हेनें जनतेसमोर मांडीत असे. बालविवाहाविरुद्ध व पुनर्विवाहाच्या बाजूनें त्यानें अनेक लेख लिहिले. त्याचीं इतर पुस्तकें 'इंयिन आय ऑन इंग्लिश लाईफ' (इंग्रजी) व 'गुजराथ अँड दि गुजराथीज' (इंग्रजी) ही होत.