विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मयूर- एक प्रसिद्ध संस्कृत कवि. याच्या बालपणासंबंधीं व जन्मस्थानासंबंधीं कांहींच माहिती उपलब्ध नाहीं. याचा धंदा जांगुलिकाचा म्हणजे सर्पवैद्याचा असावा असें हर्षचरितांत व इतर ठिकाणीं त्याला जांगुलिक हें विशेषण लावण्यांत येतें त्यावरून दिसतें. हा हर्षाच्या पदरीं होता. यानें मथूराष्टक, सूर्यशतक व इतर बऱ्याच कविता लिहिल्या. याचें सूर्यशतक हें गौडी भाषापद्धतींत लिहिलें असून तें फार नांवाजलेलें आहे. मयूर हा बाणाच्या बायकोचा भाऊ असून तिच्या शापानें कुष्टरोगी बनला; त्यानें आपला रोग सूर्याची शंभर श्र्लोकांत प्रार्थना करून घालविला अशी दंतकथा आहे.