विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मनमाड- मुंबई, नाशीक जिल्ह्याच्या चांदोर तालुक्यांतील गांव. लोकसंख्या सुमारें ७ हजार. हें ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेवर जंक्शन असून येथून हैद्राबाद संस्थानी रेल्वेचा फांटा फुटतो. येथून ४ मैलांवर अंकाईटंकाईचा किल्ला आहे. येथें खानदेश व मालेगांवकडून कापूस येतो.