विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुवनी, पो ट वि भा ग.- बंगाल, दरभंगा जिल्हा. क्षेत्रफळ १३४६ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) ११३५७७१. येथील जमीन रब्बी पिकाला फार अनुकूल असून हिवाळयांत तांदुळाचें पीक चांगलें येतें.
श ह र.- हें दरभंगा शहरापासून १६ मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) १६५००.