विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मद्रदेश- भारतवर्षीय देश. हा पश्चिम आनर्त देशाच्या पश्चिमेस असून याची राजधानी शाकल नांवाची नगरी होती. मद्रदेश बियासनदीपासून चिनाबपर्यंत किंवा दुसऱ्या कांहीच्या मतें झेलमपर्यंत पसरला होता. येथें दशरथ राजा व सीरध्वज जनक यांच्या वेळीं चारुदेष्ण राजा होता आणि पांडवांच्या वेळेस शल्य राजा होता. महाभारतांत कर्णपर्वांत कर्णानें मद्रदेशाचें वर्णन करून शल्यास खिजविल्याचा उल्लेख आहे. मद्रदेशांतील पुरुष नीच व दुराचारी असून स्त्रिया मद्यपी व व्यभिचारी असतात असें तो सांगतो (कर्णपर्व अ. ४०)