विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंदार- हें एक सरळ पसणारें व पुष्कळ वर्षें टिकणारें झुडूप असून उष्णकटिबंधंत उष्ण परंतु ओलसर ठिकाणीं सांपडतें. हिंदुस्थानांत हें विशेषकरून बंगाल, आसाम, दक्षिण हिंदुस्थानांत होत असून सिलोन, सिंगापूर, मलाया व चीन या देशांत आढळतें. याची दुसरी एक जात आहे; ती रुक्ष भागांत वाढते. या झाडाच्या पांढऱ्या चिकापासून गटापर्चा, सालीपासून मजबूत वाक, बियापासून उपयोगी पडण्यासारखा कापूस व मुळींच्या सालीपासून औषधें तयार करतात.