विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंदर- या पर्वताचें वर्णन पुराणांतून आलेलें आहे. समुद्र मंथनाच्या वेळीं हाच पर्वत रवीकरितां वापरला होता. हा पर्वत भागलपूर जिल्ह्यांतील बोसीजवळच्या मोठया मैदानांत आहे. याच्याभोंवतीं पुष्कळ तलाव आणि पडक्या इमारती, दगडी पुतळे वगैरे आहेत. याजवळ एक शहर असून तें चोळ राजाची राजधानी होतें असें सांगतात.