विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदय- उत्तर ब्रह्मदेश, मंडाले जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ३२१ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) ५४५५०. तालुक्यांत एकंदर खेडीं १११ असून तहशिलीचें मुख्य गांव मदय (लोकसंख्या १ १/२ हजार) होय. श्वेतचंग कालवा तहशिलीमधून गेला असल्यामुळें येथील जमिनींत केव्हां केव्हां तीन पिकें निघतात.