विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदनपाल (१३७५)- हा टाककुलांतील राजा दिल्लीच्या उत्तरेस नदीच्या तीरावरील काष्ठा अथवा काढा नांवाच्या शहरावर राज्य करीत होता. ''मदनपाल विनोद निघण्टु'' हा वैद्यककोश त्यानेंच लिहिला. आनंदसंजीवन, तिथिनिर्णयसार, शूद्रधर्मबोधिनी, स्मृतिकौमुदी वगैरे त्याच्या अमदानींत झालेले ग्रंथहि त्याचेच समजतात. त्यानें ''मदनपारिजात'' नांवाच्या ग्रंथाच्या कर्ता विश्वेश्वरभट्ट याला आपल्या आश्रयाखालीं ठेविलें होतें.