विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मत्स्येंद्रनाथ- भागवतांत ज्या (कवि, हरि, अंतरिक्ष, नारायण, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रमिल, चमस व करभाजन) नऊ योग्यांचें वर्णन आलें आहे, त्यांचे प्रसिद्ध (मत्सेंद्र, गोरक्ष, जालंदर, कानिफा, चर्पट, नागेश, भरत, रवेण, गहिनी हे) नऊ नाथ हे अवतार होत अशी समजूत आहे. त्यांपैकीं मत्स्येंद्र हा पहिला व प्रसिद्ध नाथपंथप्रवर्तक होय. याच्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. एका ॠषींचें वीर्य मत्स्यीनें गिळलें व तिच्या पोटीं हा जन्मला. हा गर्भावस्थेंत असतां शंकर पार्वतीला ब्रह्मोपदेश करीत होते तो त्यानें ऐकला. बद्रिकाश्रमीं दत्तानें त्याला योगमार्गाचा उपदेश केला. नंतर तपाचरण व तीर्थटण करून यानें गोरक्षास मुख्य शिष्य बनविलें. पुढें बंगाल्यांतील (?) स्त्रीराजंत मत्स्येंद्र लोभाविष्ट होऊन राहिला असतां गोरक्षानें त्याची तेथून सुटका केली. मत्स्येंद्राला त्या राज्यांतील राणीपासून मीननाथ नांवाचा पुत्र झाला. नंतर मत्स्येंद्राला त्या राज्यांतील राणीपासून मीननाथ नांवाचा पुत्र झाला. नंतर मत्स्येंद्रानें सातारा जिल्ह्यांतील मत्स्येंद्रगड येथें चैत्र वद्य पंचमीला समाधि घेतली (इ. स. १२१० च्या सुमार). कृष्णाकांठच्या जोंधळयास मच्छिंदरी शाळू म्हणतात. मत्स्येंद्रास विष्णूचाहि अवतार समजतात. योगमार्गांवर याचा मत्स्येंद्रसंहिता म्हणून एक ग्रंथ आहे. यानें हटयोग व शाबरी मंत्रतंत्रविद्येचा प्रसार केला. (नाथलीलामृत; भक्त्िच्विजय; महाराष्ट्र सारस्वत)