विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मझारीशरीफ- अफगाणिस्तान. अफगाण-तुर्कस्तान प्रांताची राजधानी. येथें अलीचें कबरस्थान आहे अशी आख्यायिका असल्यामुळें हें स्थल अफगाण लोकांत पवित्र मानलें जातें. इ. स. १८५२ मध्यें हें बल्खच्या सुभेदारानें घेतलें, तेव्हांपासून हें अफगाण लोकांकडेच आहे. इ. स. १८६९ पासून हें गांव अफगाण-तुर्कस्तान प्रांताची राजधानी बनलें. येथें सरासरी ६००० अफगाण कुटुंबें राहातात.