विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मच्छली, त ह शी ल.– संयुक्तप्रांतील जोनपूर जिल्ह्यांतील एक तहशील. हींत, विस्वा, मुंग्रा व राडवाडा हे ३ परगणे येतात. क्षेत्रफळ ३४४ चौरस मैल. १९११ साली येथील लोकसंख्या २२५८९३ होती. तहशिलींत दोन शहरें (मच्छली शहर व मुंग्रा बादशाहपूर) व ६११ खेडीं आहेत.
श ह र.- मच्छली तहशिलीचें ठाणें. हें जौनपूर अलाहाबाद सडकेवर आहे. याची लोकसंख्या १९११ सालीं ५७४४ होती. शहराचें जुनें नांव विस्वा होतें. विसू नांवाचा कोणी बहार (भर) सरदार आसपासच्या प्रदेशांत पुढारी होता, यावरून यास विस्वा हें नांव पडलेलें होतें.