विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंचर- मुंबई इलाखा. पुणें जिल्ह्यांतील खेड तालुक्यांतलें एक गांव. हें खेडपासून उत्तरेस १२ मैलांवर आहे. गांवाभोंवती तट आहे. मंचर हें १८६८-६९ सालपर्यंत होळकरांच्या ताब्यांत होतें. पुढें तें इंग्रजांनां देण्यांत आलें. येथें हेमाडपंती तऱ्हेचें सरासरी २५ चौरस यार्डाचें एक पाण्याचें टाकें असून त्यास पायऱ्या आहेत. हें पूर्वी मुसुलमानी रिसायतींत महत्त्वाचें शहर असावें.