विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मगरतलाव (मगरपीर)- मुंबई, सिंधप्रांत, कराची जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें कराचीपासून ९ मैलांवर आहे. येथें एक देवालय आहे. तलावाचे पाणी ऊन असतें. आसपासचा प्रदेश डोंगराळ व खडकाळ असून पूर्वी येथें तलाव होता; त्यांत शेंकडो माणसाळलेल्या मगरी राहात होत्या. तो तलाव आतां आटून कोरडा झालेला आहे. पाण्याच्या तळयातील ऊन्ह पाण्याचें उष्णमान १५३˚ अंशापर्यंत असतें. यांत स्नान केलें असतां त्वप्रेग बरे होतात. हिरानंदकोडीखाना याच हेतूनें येथें स्थापन करण्यांत आलेला आहे. कराचीपासून मगरतलावापर्यंत पक्की सडक गेलेली असून पुढें ती हबनदीपर्यंत गेलेली आहे. येथें एक धर्मशाळा व बंगला बांधला आहे.