विभाग आठरावा : बडोदें ते मूर
म- या वर्णाच्या चार मुख्य अवस्था दाखवितां येतील. पहिली अशोकाच्या गिरनार लेखांमध्यें; दुसरी महाक्षत्रप शोडासच्या वेळच्या (ख्रिस्त पूर्व. १ ल्या शतकाचा सुमार) मथुरा येथील जैन लेखांत; तिसरी समुद्रगुप्ताच्या अलाहाबादच्या स्तंभावर (इसवी सन चवथें शतक); व चवथी राजा यशोधर्मनच्या वेळच्या भंदसोर लेखांत (इ.स.५३२) 'म' या अक्षराकृतींत आढळून येतें. (प्राचीन लिपिमाला)