विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोपाळ एजन्सी- हा एक संस्थानांचा समूह असून तो पोलिटिकल एजंटाच्या देखरेखीखालीं आहे. हा एजंट गव्हर्नर जनरलच्या एजंटच्या हाताखालीं असतो. दक्षिणेस व पूर्वेस मध्यप्रांत; उत्तरेस ग्वाल्हेर व राजपुताना एजन्सी व पश्चिमेस काली सिंध. क्षेत्रफळ ९१५४ चौरस मैल, व लोकसंख्या (१९११) १०५०७३५. या एजन्सीची स्थापना १८१८ सालीं झालीं. एजन्सीचा एजंट सिहोर येथें राहातो. त्यास पहिल्या प्रतीच्या संस्थानांखेरीज इतर ठिकाणीं जिल्ह्याच्या सेशन जज्जाचे अधिकार आहेत.
भो पा ळ ए ज न्सीं ती ल सं स्था नें.- भोपाळ, राजगड, नरसिंहगड, कोरवाई, खिलचीपूर, मकसूदनगड, महंमदगड, बसोडा, पथारी, दरियांखरी, धाबलाधीर, धाबलाघोसी, डुगी, हिरोपूर, जबरियामिल, झालेरा, कमालपूर, खजूरी, खरसी, पथारिया, पिपलियानगर, रामगड, सदानखेरी, देवास (मोठी पाती), देवास (लहान पाती), धार, ग्वाल्हेर, इंदूर, टोंक (राजपुताना).