विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोनगांव- संयुत्तप्रांतांत मैनपुरी जिल्ह्यांतील पूर्वेकडील एक तहशील. क्षेत्रफळ ४५९ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) २१९७८९. या तहशिलीचें मुख्य गांव भोनगांव असून तें ईस्ट इंडियन रेल्वेचा शाखेवर आहे. हें गांव भीमराजानें बसविलें अशी तेथील लोकांत आख्यायिका प्रसिद्ध आहे.