विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोग्नीपूर- किंवा पुरवरायण. संयुक्तप्रांतांतील कानपूर जिल्ह्यांतील नैर्ॠत्येकडील तहशील क्षेत्रफळ ३७७ चौ. मैल. लोकसंख्या (१९११) १३३९४६. हींत ३११ खेडीं आहेत. दक्षिणेस यमुना नदी असून सेंगरनदी उत्तरेच्या बाजूनें येऊन एकदम वळसा घेऊन यमुनेस मिळतें. गंगेच्या कालव्याचा फांटा येथून जातो.