विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भेडाघाट- मध्यप्रांत, जबलपूर जिल्हा. या गांवीं नर्मदा नदी संगमरवरी पहाड फोडून बाहेर निघाली आहे. या फोडलेल्या पहाडांची उंची १२० फूट आहे. येथील देखावा फार भव्य आहे. चंद्रप्रकाशांत हा देखावा पाहिला तर तो फारच मनोरम दिसतो. ह्या घाटाजवळ पुष्कळ निमुळत्या टेंकड्या आहे. ह्यापैकीं एका टेंकडीवर एक चमत्कारीक देवालय आहे. ओबडधोबड गुहाहि या ठिकाणीं ब-याच आहेत. भेडाघाटगांव जबलपूर शहरापासून रस्त्यानें १३ मैं. आहे. हें गांव जी. आय. पी. वरील मीरगंज स्टेशनापासून ३ मैलांवर आहे.