विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुज- मुंबई इलाखा, कच्छ संस्थानची राजधानी. 'भुजंग' या शब्दावरून हीस हें नांव पडलें. ही एका तटबंदी टेंकडीच्या पायथ्याशीं आहे. लोकसंख्या सुमारें २१ हजार. येथें म्युनिसिपालटी, २ हायस्कुलें, तुरुंग, दवाखाना, इस्पितळ वगैरे संस्था आहेत. पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीनें हें स्थळ फार महत्त्वाचें आहे. राव लाखाचा राजवाडा प्रेक्षणीय आहे.